भरधाव डंपरची ओमनी कारला धडक, दोन जण जखमी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील सुनसगावजवळ भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत ओमनी कारमधील दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता घडली होती. याप्रकरणी रविवारी ४ ऑगस्ट रोजी डंपरवरील अज्ञात चालकावर भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कैलास पुंडलिक सुशिर वय ४५ रा. कोल्हाडी ता, बोदवड हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते ओमनी कार क्रमांक एमएच १९ बीजे ८५१७ ने बोदवडकडून जळगाव येण्यासाठी सुनसगाव मार्गे येत असतांना सुनसगावाजवळ समोरून भरधाव वेगाने येणारा डंपर क्रमांक एमएच ४५ १२४५ ने जोरदार धडक दिली. या धडकेत कैलास सुशिर आणि सोबत असलेले प्रकाश निना सोनार वय ४१ रा. कोल्हाडी ता.बोदवड हे गंभीररित्या जखमी झाले. जखमींना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. याप्रकरणी रविवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात डंपरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव हे करीत आहे.

Protected Content