पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलीच्या भेटीला चारचाकी कार मधुन वृद्ध दाम्पत्य जात असतांनाच धावत्या कारला अचानक आग लागली. सदरचा प्रकार लक्षात येताच वृद्ध दाम्पत्य कार मधुन उतरुन पळाल्याने पुढील अनर्थ टळला. घटनेत कार पुर्णतः जळुन खाक झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विठ्ठल वना मिस्तरी व सुनंदाबाई विठ्ठल मिस्तरी रा. पिंपळगाव (गोलाईत) ता. जामनेर हे वृद्ध दाम्पत्य मळगाव ता. भडगाव येथील मुलीला भेटण्यासाठी पिंपळगाव गोलाईत येथुन चारचाकी कार क्रं. (एमएच १९ सीएफ ४६१) ने निघाले होते. दरम्यान पाचोरा तालुक्यातील बांबरुड खुर्द महादेवाचे गावानजीक कार पिक अप घेत नव्हती म्हणुन विठ्ठल मिस्तरी यांनी कार बाजूला घेत बोनेट उघडले असता अचानक स्पार्कींग होवुन कारने पेट घेतला. विठ्ठल मिस्तरी व सुनंदाबाई मिस्तरी तात्काळ कार पासुन बाजुला झाल्याने सुदैवाने वृद्ध दाम्पत्य बचावले. घटनेची माहिती मिळताच पाचोरा नगरपालिका व भडगाव नगरपालिकेचे अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल होवुन कारला लागलेली आग विझविण्यात आली. घटनास्थळी पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अशोक पवार हे दाखल होवुन घटनास्थळाची पाहणी केली. पो. काॅ. योगेश पाटील, ट्राफीक पोलिस यांनी वाहतूक सुरळीत केली.