सीएसएमटी ते अयोध्यादरम्यान विशेष एक्स्प्रेस ट्रेन धावणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रवाशांची गर्दी विभागण्यासाठी मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते उत्तर प्रदेशातील अयोध्यादरम्यान विशेष एक्स्प्रेस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २९ ऑगस्ट २०२४ पासून विशेष ट्रेन सुरू केल्या जाणार आहे. मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

गाडी क्रमांक ०१०१९ येत्या २९ ऑगस्टला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री ११.२० वाजता सुटेल. तर, दुसऱ्या दिवशी म्हणजेच ३० ऑगस्टला सकाळी ९.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी अयोध्येतून ३१ ऑगस्टला रात्री ११.४० ला निघेल आणि १ सप्टेंबरला सकाळी ८.१५ मुंबईत पोहोचेल. कल्याण, इगतपुरी, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर आणि लखनऊ स्थानकांवर गाडी थांबेल. सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सोमवारी या गाडीसाठीचे आरक्षण खुले होणार आहे.

Protected Content