Home Cities जळगाव लिनेस क्लब जळगावचा सामाजिक उपक्रम; हमाल व रिक्षाचालकांना चप्पल-रुमाल वाटप

लिनेस क्लब जळगावचा सामाजिक उपक्रम; हमाल व रिक्षाचालकांना चप्पल-रुमाल वाटप


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये दिवसभर कष्ट करणाऱ्या श्रमिक बांधवांसाठी लिनेस क्लब जळगावतर्फे सामाजिक बांधिलकी  जपत चप्पल व रुमाल वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून हमाल व रिक्षाचालक बांधवांना दिलासा मिळाला असून, समाजातील गरजू घटकांप्रती संवेदनशीलता अधोरेखित झाली.

शहरातील विविध भागांतील हमाल व रिक्षाचालकांना या उपक्रमांतर्गत चप्पल व रुमालांचे वितरण करण्यात आले. उन्हाच्या कडाक्यात काम करताना या वस्तूंची मोठी गरज भासते, याची जाणीव ठेवून लायन्स क्लबने पुढाकार घेत हा उपक्रम आयोजित केला. लाभार्थ्यांनी या मदतीबद्दल समाधान व्यक्त करत आयोजकांचे आभार मानले.

या कार्यक्रमासाठी लिनेस क्लब जळगावच्या अध्यक्षा रेखा वर्मा, सचिव नीला चौधरी, कोषाध्यक्ष ज्योति कोटेचा, प्रोजेक्ट चेअरमन विजया बाफना, वीना मुंगड, दीपिका खैरनार यांचे विशेष योगदान राहिले. तसेच प्रायोजक म्हणून विमल रईसोनी, हिना जैन, स्वाती मनोज, कश्मीरा पिपरिया, सोनल ओसवाल, रीटा नवलखा आणि स्वामी मनोज यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रवीण पगारिया यांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळत मोलाचे योगदान दिले.

कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. लायन्स क्लबच्या सदस्यांनी एकत्रितपणे काम करत समाजोपयोगी उपक्रम यशस्वी केला. अशा उपक्रमांमुळे समाजातील गरजू घटकांना मदत मिळण्याबरोबरच सामाजिक ऐक्य व परस्पर सहकार्याची भावना दृढ होत असल्याचे चित्र दिसून आले.


Protected Content

Play sound