जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा खळबळजनक प्रकार मंगळवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आला आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. मंगळवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता घराशेजारी राहणारा संशयित आरोपी योगेश तेजमल पवार हा तिच्या घरी येवून तिला सांगितले की तुला माझ्या बायकोने घरच्या मजल्यावर बोलावले आहे, असे सांगितले. त्यानुसार पिडीत मुलगी ही संशयित आरोपीच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेली. त्यावेळी संशयित आरोपी योगेश पवार हा मागून येवून तिचे तोंड दाबून तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने घडलेला प्रकार नातेवाईकांना सांगितला. त्यानुसार पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी योगेश पवार याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि ए.सी. मोरे हे करीत आहे.