पणजी-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | एकीकडे राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला प्रतिसाद मिळत असतांना दुसरीकडे गोवा विधानसभेत पक्षाला जबर धक्का बसणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
गोवा राज्यात ऑपरेशन लोटस यशस्वी होणार असल्याचे संकेत आता मिळाले आहेत. गोव्यातील ११ पैकी ८ आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तनावडे यांनी दिली. माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, मायकल लोबो यांच्यासह ८ आमदारांनी बुधवारी सकाळी बैठक घेतली आणि यावेळी कॉंग्रेस सोडीचा निर्णय घेतला. आता हा आमदारांचा गट भाजपात विलीन होणार आहे. या आमदारांनी भाजपात विलीनीकरणासंदर्भात विधानसभेच्या सचिवांनाही पत्र दिलं आहे.
कॉंग्रेस पक्षातून माजी विरोधी पक्षनेते मायकल लोबो तसेच माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यासह डिलायला लोबो; राजेश फळदेसाई, रुदाल्फ फर्नांडिस, अलेक्स सिक्वेरा, केदार नाईक आणि संकल्प आमोणकर या आमदारांनी पक्ष सोडण्याची तयारी केली असून ते भाजपमध्ये सहभागी होणार आहेत. यामुळे ४० सदस्यसंख्या असणार्या गोवा विधानसभेतील भाजपचे बळ हे २० वरून २८ पर्यंत पोहचणार आहे.