पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली . यात ७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत . याप्रकरणी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की , रविवारच्या आठवडे बाजारात सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आरोपी शाकेराबी हिने तीची बोंबिलची पोतडी साक्षीदार शामराव भोई यांच्या दुकानाच्या पैशाच्या गल्ल्यावर ठेवली . ती पोतडी बाजूला करण्यासाठी सांगीतल्याच्या कारणावरून हाणामारी झाली.
यावेळी फिर्यादीला व नातेवाईकांना बांबूच्या काठ्यांनी तोंडावर , डोक्यावर तसेच पाठीवर मारहाण करून गंभीर दुखापत करून शिवीगाळ व दमदाटी केली. याप्रकरणी शोभा अशोक भोई (५४) रा . पहूर पेठ यांच्या फिर्यादीवरून गफ्फार लतीफ , फकीरा लतीफ , इमरान काल्या , मोशा बुढण , बबल्या फकीरा , ब बबल्याचा मुलगा , रोशन , शहारूख , समिर , साहील , साकेराबी , सुफीयाबी , साकेराबी हीची मुलगी , रा . पहूर पेठ यांच्या विरुद्ध गु.र. नं. २ / २०२४ भादवी कलम १४३ / १४७ / १४८ / १४९ / ३२३ / ५ 0४ / ५० ६ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
तसेच वरील कारणावरून इमरान शेख अब्दल रा . पहूर पेठ यांच्या फिर्यादीवरून संजय भोई , अशोक भोई , अशोक भोईचा मुलगा , हरीष भोई , शामराव भोई , शोभा बाई भोई व नातेवाईक यांच्या विरुद्ध गुरन 3 / २०२४ भादवी कलम १४३ / १४७ / १४८ / १४९ / ३२३ / ५०४ / ५०६ प्रमाणे नोंदविण्यात आला आहे . पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन केले .
याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दिलीप पाटील व सहकारी करत आहेत . दरम्यान गावात तणावपूर्ण शांतता आहे.