रेल्वेस्थानक परिसरात रिक्षाचालकाला मारहाण 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बघण्याच्या कारणावरून रिक्षाचालकाला पाच जणांनी लोखंडी कैचीने वार करून दुखापत केल्याची घटना शहरातील रेल्वेस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी गुरूवार २१ जुलै रोजी दुपारी शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मोनल विजय रतवेकर (वय-२७) रा. गेंदालाल मील,जळगाव हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला असून रिक्षा चालवून आपला उदरनिर्वाह करतो. गुरूवार २१ जुलै रोजी पहाटे साडे तीन वाजेच्या सुमारास जळगाव रेल्वे स्टेशनच्या आवारात उभा असतांना एहसान अली हैदर अली हा जवळ येवून माझ्याकडे का बघतो असे सांगून मारहाण केली. त्याच्या सोबत असलेले हैदर अली बालम अली, शरेखान बालम अली, अरबाज शेख रा. उस्मानिय पार्क आणि एक अनोळखी या पाच जणांनी देखील मारहाण केली. यातील अरबाज शेख याने हातातील लोखंडी कैची घेवून मोनल रतवेकर याच्या डोक्यावर वार केले तर एकान हातातील लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत मोनल हा गंभीर जखमी झाला आहे. मोनल रतवेकर याच्या फिर्यादीवरून दुपारी शहर पोलीस ठाण्यात एहसान अली हैदर अली, हैदर अली बालम अली, शरेखान बालम अली, अरबाज शेख रा. उस्मानिय पार्क आणि एक अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे करीत आहे.

Protected Content