मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरासह तालुक्यात मोटारसायकल चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून पोलिसांनी यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
तालुक्यातून अनेक ठिकाणी दुचाकी चोर होत असल्याच्या घटना घडत आहेत. यातच आता पुन्हा एकदा एक घटना मुक्ताईनगर शहरांमध्ये रेणुका माता नगर मध्ये घडली आहे. येथील मोलमजुरी करणारा सतीश संजय महाजन माळी या तरूणाची शाईन कंपनीची मोटरसायकल ०२.०२.२०२४ वार शुक्रवार रात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. यामुळे हा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखीत झाला आहे.
अशा प्रकारच्या घटना वारंवार होत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिसांनी यावर गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. तर नागरिकांनी देखील आपापल्या वाहनांची व्यवस्थीत काळजी घ्यावी अशी मागणी करण्यात येत आहे.