जळगाव -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । – मोटारसायकल चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नशिराबाद येथून एका चोरट्यांला अटक केली असून त्यांच्याकडून ३ लाख १० हजार रूपये किंमतीच्या १० मोटारसायकली पोलीसांनी जप्त केल्या असून पुढील कारवाईसाठी चोरट्याला शनीपेठ पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कल्पेश ज्ञानेश्वर चौधरी यांनी भानू हॉटेल परिसरातून त्यांची हिरो स्प्लेंडर (एमएच १९ बीवाय ७४१३) चोरी झाल्याची तक्रार २७ फेब्रुवारी २०२६ रोजी शनिपेठ पोलीस ठाण्यात दिली होती. या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड आणि त्यांच्या पथकाला समीर शेख शफीक शेख वय २० रा. नशिराबाद याने दुचाकी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीसांनी कारवाई करत त्याला अटक केली. त्याने चौकशीत जळगाव शहरच नव्हे, तर एमआयडीसी, जिल्हापेठ आणि चक्क मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथूनही मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले आहे. त्याच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे अनेक गुन्ह्यांची उकल झाली असून, पुढील तपासासाठी आरोपीला शनिपेठ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.




