नशिराबाद येथून अल्पवयीन मुलाला पळविले

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नशिराबाद येथील पंढरपूर नगरातून 14 वर्षे अल्पवयीन मुलाला अज्ञात व्यक्तीने फूस  लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे, याबाबत मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

अधिक माहिती अशी की, नशिराबाद शहरातील पंढरपूर नगरात 14 वर्षे अल्पवयीन मुलगा हा आपल्या कुटुंबीयांचा वास्तव्याला आहे. 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजता अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेले. दरम्यान मुलाच्या नातेवाईकांनी सर्वत्र त्याचा शोध घेतला, परंतु तो कुठेही मिळून आला नाही, अखेर मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

 

Protected Content