चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील एका भागात राहणारी अल्पवयीन मुलीकडे एकटक बघून अश्लिल हातवारे करून तिचा विनयभंग केला. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक असे की, चाळीसगाव शहरातील मालेगाव रोड येथे १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी वास्तव्याला आहे. त्याच परिसरात राहणारा धनंजय दिपक पाटील हा गेल्या २०१८ पासून पिडीत मुलीकडे एकटक पध्दतीने पाहून तिचा वारंवार अश्लिल हातवारे करत विनयभंग केला. शिवाय २७ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास तिचा पाठलाग केला.
त्यावेळी पिडीत मुलीच्या आईने जाब विचारला असता त्यांच्याशी धक्काबुक्की करून ढकलून दिले. माझ्या नांदी लागले तर ढकलून देईल अशी धमकी दिली. बुधवार २७ सप्टेंबर रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी धनंजय पाटील याला पोलीसांना ताब्यात घेतले आहे.