शिरसोलीतून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील शिरसोली येथील १६ अल्पवयीन मुलीला एकाने फूस लावून पळवून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावात एका भागात राहणारी १६ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. गुरुवार २८ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील कानळदा येथील राहणारा किसन पिंटू बारेला याने अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेले आहे. याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी शुक्रवारी २९ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तरुणाविरोधात तक्रार दिली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी किसन पिंटू बारेला याच्याविरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रवींद्र गिरासे करीत आहे.

 

Protected Content