जळगावातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका महाविद्यालयातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागातील रहिवासी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. २१ मार्च  रोजी मुलगी शहरातील एका महाविद्यालयात गेली होती. त्यानंतर पुन्हा घरी परतली नाही. त्यानंतर सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास मुलीच्या वडीलांनी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय तक्रारीत व्यक्त करण्यात आला असून त्यावरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक रोहिदास गबाडे करीत आहेत.

 

Protected Content