वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील एका गावात राहणारी अल्पवयीन मुलीला वरणगावातील महाविद्यालयासमोरून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, १७ वर्षीय मुलगी आपल्या परिवारसह भुसावळ तालुक्यातील एका गावात वास्तव्याला आहे. वरणगाव येथील नुतन मराठा महाविद्यालयात शिक्षण घेते. सोमवारी ६ सप्टेंबर रोजी सकाळी ७ ते २ वाजेच्या दरम्यान ती महाविद्यालयात वरणगाव येथे गेली होती. दरम्यान सायंकाळ पर्यंत मुलगी घरी न आल्याने कुटुंबियांनी चिंता व्यक्त केली. तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही आढळून आली नाही. अखेर बुधवारी ७ सप्टेंबर रोजी दुपारी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहे कॉन्स्टेबल मुकेश जाधव करीत आहे.