जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जळगाव तालुक्यातील एका गावामधील १७ वर्षे ११ महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला ५ ऑगस्ट रोजी एका जणाने पळवून नेले. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, ५ ऑगस्ट रोजी रात्री १२ वाजेपासून ते सकाळी सहा वाजेदरम्यान अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मुलीला पळवून नेले. तिचा शोध घेतला मात्र ती न सापडल्याने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक अमोल मोरे हे करीत आहेत.