धावत्या रेल्वेतून पडल्याने परप्रांतीय तरूणाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव रेल्वे स्थानकाजवळील फलाट क्रमांक ३ जवळ धावत्या रेल्वेतून पडल्याने एका ३० वर्षीय परप्रांतीय तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी १३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या खिशात सापडलेल्या चिठ्ठीवर एक क्रमांक आढळून आला असून त्यावरून तो राजस्थानचा असल्याचे समोर आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव रेल्वेस्थानकावरील फलाट क्रमांक तीनजवळ डाऊन रेल्वे मार्गावर खांबा क्रमांक ४१५/२७ जवळ एक तरुण पडलेला असल्याची माहिती मालगाडी चालकाने शनिवारी १३ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता दिली. त्यानंतर लोहमार्ग पोलिस दलाचे पोहेकॉ सचिन भावसार व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली व मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेला. तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. या तरुणाच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. त्यावर असलेल्या मोबाईल क्रमांकांवर लोहमार्ग पोलिसांनी संपर्क साधला असता तो क्रमांक राजस्थान येथील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रेल्वे पोलीसांनी संबंधितांना तरुणाविषयी माहिती नातेवाईकांना देण्यात आली आहे. ते आल्यानंतरच तरुणाची ओळख पटू शकणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Protected Content