सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खानदेश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी साध्या, सरळ आणि सोप्या शब्दातून जीवनाचे तत्वज्ञान उलघडून साहित्य क्षेत्रातील खजिनाच महाराष्ट्रापुढे आनला असून अक्षरज्ञान नसलेल्या मात्र मानवी जीवनाचे गुढ शब्दबद्ध करून विद्यापीठाला नाव दिले जावे अशी थोरवी निर्माण करणाऱ्या खानदेशी अस्मिता असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा अरे संसार संसार ही बहिनाईची गाणी आणि कवितांची सुरेल सांगितिक मैफल परिवर्तन जळगाव यांच्या माध्यमातून फैजपूर येथे शुभदिव्य मंगल कार्यालय, बस स्टँड समोर, फैजपूर येथे शनिवारी दिनांक 14 डिसेंबर 2024 संध्याकाळी सात वाजता आयोजित केली आहे.
या अभिनव प्रयोगाची संकल्पना श्री विजय जैन तर दिग्दर्शन श्री नारायण बाविस्कर यांनी केले असून रतनलाल सी बाफना ज्वेलर्स यांच्या सुवर्ण महोत्सवी उत्सवानिमित्त बहिणाबाईचा जीवनपट उलगडणारा अभिनव प्रयोग फैजपूर येथे आयोजित केला आहे. यासंबंधी तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात नियोजनाची सभा नुकतीच पार पडली. यात ज्येष्ठ नाट्यकर्मी श्री शंभू पाटील व अनुभूती स्कूलचे श्री हर्षल पाटील यांची उपस्थिती लाभली.
या सभेला अध्यक्ष म्हणून तापी परिसर विद्या मंडळाचे सदस्य तथा धनाजी नाना महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ जी पी पाटील लाभले. यासोबत खानदेशातील सुप्रसिद्ध कथाकथनकार प्राध्यापक व पु होले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे, प्रा डॉ जगदीश पाटील, अधिष्ठाता, मानव्यविद्या शाखा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, रवींद्र कुमावत, पाल, उपप्राचार्य प्रा डॉ एस व्ही जाधव, उपप्राचार्य प्रा डॉ कल्पना पाटील, बहिणाबाईला गणबोलीत सुरेल सादर करणाऱ्या प्राध्यापिका डॉ राजश्री नेमाडे यांच्यासहित प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती लाभली. यावेळी मान्यवरांनी खानदेशी अस्मिता असलेल्या बहिणीचे जीवनपट व काव्य खजिना समाजापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी जास्तीत जास्त मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले. सदर कार्यक्रम सर्वांसाठी मोफत व खुला असून या अभिनव प्रयोगाचा आनंद फैजपूरवासीय व पंचक्रोशीतील नागरिकांनी घ्यावा असे नम्र आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.