Home Cities चाळीसगाव जनरेटरच्या स्फोटाने हॉटेला भीषण आग; पोलिसांच्या धाडसामुळे ६-७ जणांचे प्राण वाचले!

जनरेटरच्या स्फोटाने हॉटेला भीषण आग; पोलिसांच्या धाडसामुळे ६-७ जणांचे प्राण वाचले!


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव रोडवरील हॉटेल मनसुख येथे शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी २२ एप्रिल रोजी पहाटे ३ वाजता घडली. आगीच्या दरम्यान हॉटेलमधील जनरेटरच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली होती.

घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्वरित कार्यवाही करत हॉटेलमध्ये अडकलेल्या ६ ते ७ जणांना अत्यंत धाडसाने सुरक्षितरित्या बाहेर काढले आणि त्यांचे प्राण वाचवले. या बचावकार्यात पोलीस उपनिरीक्षक गणेश सायकर यांना किरकोळ दुखापत झाली. त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार पुरवण्यात आले असून, सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आणि त्यांना घरी विश्रांतीसाठी पाठवण्यात आले आहे.

दरम्यान, अग्निशमन दलाच्या (फायर ब्रिगेड) जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग पूर्णपणे नियंत्रणात आणली. आगीच्या कारणांचा अधिकृत तपास सुरू असून, घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आणि इतर आवश्यक माहिती तपासासाठी सुरक्षित ठेवण्यात आली आहे. या दुर्घटनेत चाळीसगाव शहर पोलिसांनी दाखवलेले सतर्कता आणि असीम धैर्य खरोखरच कौतुकास्पद आहे. पोलिसांनी केलेल्या या धाडसी कार्यामुळे अनेक लोकांचे प्राण वाचले आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन नेहमीच तत्पर असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, असे चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी सांगितले.


Protected Content

Play sound