जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने खान्देश कन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी व्याख्यानमालेत आहार तज्ज्ञ डॉ. प्रणिता अशोक (पुणे) यांचे ‘बदलती जीवनशैली आणि आहार’ या विषयावरील व्याख्यान शनिवार, दि. २४ सप्टेंबर रोजी दु. ४.०० वाजता ऑनलाईन पध्दतीने आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी अध्यक्षस्थानी स्त्री अभ्यासकेंद्राच्या प्रभारी प्रमुख प्रा. रत्नमाला बेंद्रे या राहणार आहेत. हे व्याख्यान Zoom Link (Meeting ID: 97999486549, Passcode: Lifelong) होणार असून Youtube व facebook वरून सदरचे व्याख्यान ऐकता येईल. तरी सर्वांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे विभागाचे संचालक प्रा.आशुतोष पाटील यांनी कळविले आहे.