जळगाव – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पाणीपुरवठा करणाऱ्या वा गुरु पाणीपुरवठा मुख्य जलवाहिनी ‘विद्या फाउंडेशन’जवळील रस्त्यावर गळती दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतल्याने जळगाव शहराचा होणारा पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्यात येत आहे.
दिनांक १६ मार्च रोजी होणारा पाणीपुरवठा १७ मार्च रोजी तसेच दि.१७ आणि १८ मार्च रोजीचा पाणी पुरवठा अनुक्रमे १८ आणि १९ रोजी करण्यात येणार आहे.
यासंदर्भात जळगाव शहर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले असून पाण्याचा काटकसरीने वापर करावा असं आवाहन करण्यात आले आहे.