अमळनेर (प्रतिनिधी) येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल आणि ज्यू.कॉलेजने सलग दहाव्या वर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. यावर्षी हर्षल धनगर याने 87.20 टक्के मिळवत शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.
विजयनाना पाटील आर्मी स्कूलमध्ये हर्षल धनगर याने 87.20 टक्के मिळवत प्रथम क्रमांक पटकावला तर लोकेश पाटील याने 86.40 टक्के मिळवून द्वितीय तर कर्तव्य माळी याने 85.40 टक्के मिळवून तृतीय क्रमांक पटकावला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीयमंत्री विजय नवल पाटील व कार्याध्यक्ष अनिकेत विजय पाटील, प्रशासकीय अधिकारी डी.बी.पाटील, प्राचार्य एस.यु.पाटील यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.