फैजपूर, प्रतिनिधी | येथे नुकतेच (दि.३ व ४) असे दोन दिवस ऐतिहासिक बौद्धकालीन कलाशिल्प प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाउपासिका रमाबाई मनोहर भालेराव यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन पुजनिय भन्तें गुणरत्न महाथेरो, धम्मशरण भन्तें, आनंद भन्ते, अश्वजीत भंन्ते, सारिपुंत भंन्ते, आनंद भन्ते, उपस्थित होते.
हे प्रदर्शन येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी हॉल येथे लावण्यात आले होते. सदर प्रदर्शना अश्र्विनी शोध संस्था महिदपुर, मध्यप्रदेश येथे डॉ.आर.सी. ठाकुर यांचे रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटरमध्ये संग्रहित असलेली मौल्यवान व पुरातन बौद्धकालीन नाणी ठेवण्यात आली होती.तसेच आमोदा येथे १० दिवसांचे बौद्ध श्रामनेर शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी १०० नवतरुणांनी सहभागी होवून बौद्ध चिवर परिधान केले. सदर संघाने उपस्थिती देवुन प्रदर्शन सोहळयात सहभागी होवून माहिती घेतली.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमोदा येथील बौद्ध बांधव, तरुण कार्यकर्ते, बौद्ध उपासक व महिला उपासिका परिश्रम घेत आहेत. या प्रदर्शनासाठी आयु. अशोक भालेराव, समाज सेवक तथा धम्मसेवक फैजपूर यांचे सहकार्य लाभले. आमोदा येथील विश्वनाथ तायडे, महेंद्र तायडे, गौतम तायडे, रामकृष्ण तायडे ,प्रदीप तायडे, अशोक तायडे, राजेंद्र तायडे, दिलीप मोरे, किशोर तायडे, सुरज तायडे, सर्व बौद्ध समाज बांधव, तरुण व महिला यांनी परिश्रम घेतले.