
चाळीसगाव (प्रतिनिधी) हिंदू शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या 479 व्या जयंतीनिमित्त आज सकाळी शहरातून भव्य मोटार सायकल रॅली काढण्यात आली.
आज सकाळी पाटील वाडा भागातील जय बजरंग व्यायाम शाळा येथे महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेचे पूजन चाळीसगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष शिवाजी देवसिंह राजपूत यांनी केले. चाळीसगाव जुने विमानतळ येथे महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहपूर्ण व जल्लोषात साजरी करण्यात आली. चाळीसगाव नगर परिषदेचे गटनेते नगरसेवक संजय रतनसिंग पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी तेथून भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीचे स्वागत महाराणा प्रताप चौक कॉलेज पॉइंट येथे करण्यात आले. त्याठिकाणी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कॉलेज पाॅइंट मित्र मंडळाचे सर्व सदस्य हजर होते. कॉलेज पॉईंट येथून कोर्ट कचेरी घाट रोड राजनगाव दरवाजा अहिल्यादेवी पुतळ्यापासून रिंग रोड ते जुनी नगरपालिका, आडवा बाजार ते सुवर्णकार मंगल कार्यालयापर्यंत भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. तसेच सायंकाळी पाच वाजता स्टेशन येथून महाराणा प्रताप यांची ढोल-ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी ज्या समाज बांधवांना राजकीय, डॉक्टर, वकील, वैद्यकीय, शैक्षणिक, नगराध्यक्ष नगरसेवक सर्व सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी पत्रकार बांधवांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या भव्य मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराणा प्रताप जयंती उत्सव समितीने केले आहे.