शिर्डी येथे ७ फेब्रुवारीला तेली समाजाचा विराट मेळावा

जळगाव प्रतिनिधी । महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभातर्फे येत्या ७ फेब्रुवारी रोजी सिध्द संकल्प लॉन शिर्डी येथे तेली समाजाचा राज्यव्यापी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महामेळाव्याच्या अध्यक्षस्थानी तेली समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री जयदत्त क्षिरसागर असणार आहेत.

या मेळाव्याला राज्यातील तेली समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी माहिती महाराष्ट्र प्रांतीक तेली समाज महासभा जळगाव जिल्हाध्यक्ष के.डी. चौधरी यांनी दिली. या मेळाव्यासाठी जळगाव जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर युवक, युवती, महिला, पुरूष, नेते तथा कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत के.डी. चौधरी यांनी संपूर्ण जिल्ह्याचा संपर्क दौरा पूर्ण केला असून जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी जाऊन तेथे समाजाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या. अनेक कार्यकर्त्यांशी फोनवर चर्चा केली. सोशल मिडीयाद्वारे मेळाव्याची माहिती प्रसारीत केली. त्यामुळे जिल्ह्यात तेली समाजात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मेळाव्यास समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. 30 जानेवारी रोजी तेली समाज मंगल कार्यालय भुसावळ येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी भुसावळ येथून मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी निर्धार व्यक्त केला. यावेळी के.डी. चौधरी यांचा सत्कार देखील करण्यात आला. सदर बैठकीला भुसावळ तालुका तेली समाजाचे कार्यकर्ते सर्वश्री अशोक चौधरी, राकेश चौधरी, गणेश चौधरी, सुरेश चौधरी, सुनिल चौधरी आदी कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.

 

Protected Content