जळगाव, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री.जैन युवा फाऊंडेशन, जळगाव’ आयोजित ‘उद्योग उत्सव’ आणि आनंदमेळाचं भव्य आयोजन शहरातील ‘खान्देश सेंट्रल मॉल’ या ठिकाणी ‘करण्यात आलं आहे. दोन दिवसाच्या या शॉपिंग महोत्सवाला उद्यापासून सुरुवात होणार आहे.
शहरातील ‘खान्देश सेंट्रल मॉल’ या ठिकाणी जागतिक महीला दिनाच्या अनुषंगानं महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्द्येशाने शनिवार दि.५ आणि रविवार दि.६ मार्च रोजी ‘श्री.जैन युवा फाऊंडेशन, जळगाव’ द्वारा आयोजित ‘उद्योग उत्सव- २’ आणि ‘आनंदमेळा २०२२’चं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. उद्यापासून या उपक्रमास सुरुवार होणार असून त्याची अंतिम टप्प्यात जय्यत तयारी सुरु आहे.
G H RAISONI PUBLIC SCHOOL,JALGAON मुख्य प्रायोजक आणि मानराज मोटर्स, NEXA तसंच HOUSE OF JEWELS by Bafna’s सह प्रायोजक असलेल्या या शॉपिंग महोत्सवात लक्झरीयस कार, होंडा आणि शानदार इलेक्ट्रोनिक बाइक्स, आकर्षक कॉस्मेटिक्स ज्वेलरी, आधुनिक ड्रेसेस, उच्च प्रतीच्या साड्या, कलरफुल पर्स, मजबूत टिकाऊ चप्पल, लेडीज ड्रेस मटेरियल, होम आणि इलेक्ट्रोनिक्स एप्लायंसेस यासह इतर नाविन्यपूर्ण वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे.
जागतिक महीला दिनाच्या अनुषंगानं एफ.सी.आय.गोडाऊन, खान्देश सेन्ट्रल मॉल येथे शनिवार दि.५ आणि रविवार दि.६ मार्च रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत ‘उद्योग उत्सव- २’ आणि ‘आनंदमेळा २०२२’चं भव्य आयोजन करण्यात आलं आहे. फूडझोन आणि गेमझोन दुपारी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत राहणार असून या ठिकाणी मुलांसह मोठ्यांसाठी गेमझोनमध्ये मजेदार फन गेम्स आणि महिलांनी घरेलू पद्ध्तीनी बनविलेल्या गुजराती, मारवाडी, सिंधी, कच्छी, मराठी, चायनीज, मेक्सिकन, स्वीट अशा स्वादिष्ट, खमंग, रुचकर अशा खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेता येणार आहे. यासह कोल्ड-ड्रिंक देशी, विदेशी चवीचा स्वाद जिभेवर तरळणार आहे.
या उपक्रमास रमेशदादा जैन याचं सहकार्य लाभलं असून R L Hospital हे हॉस्पीटॅलिटी पार्टनर आहेत. टेंटसाठी राजेश टेंट हाउस यांचं सहकार्य लाभलं आहे. या महोत्सवाचा जळगाव शहरासह, जिल्ह्यतील नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन जैन युवा फौंडेशनचे सचिव विनय गांधी आणि रिकेश गांधी यांनी केली आहे.
व्हिडीओ लिंक
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/246336704379919