वृध्द महिलेच्या गळ्यातून ७० हजारांची सोन्याची पोत लांबविली

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरात आयोजित केलेल्या कार्यक्रमातून एका वृध्द महिलेच्या गळ्यातून ७० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील स्वामीनारायण मंदिर परिसरामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात एका वर्तमानपत्राच्या संपादिका शांता कमलाकर वाणी (वय-७८, रा. एसएमआयटी कॉलेज) या महिला जळगाव सोमवारी १६ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्वामीनारायण मंदिरात आलेल्या होत्या. रात्री ८ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७० हजार रुपये किमतीची ३५ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत चोरून येण्याची घटना घडली. सोन्याची पोत चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय बडगुजर हे करीत आहे.

Protected Content