Home Cities अमळनेर अमळनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बैलजोडींची चोरी

अमळनेर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बैलजोडींची चोरी

0
109

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील ढेकू खुर्द गावातील खळ्यातून दोन शेतकऱ्याच्या ४ बैलांची चोरी केल्याची घटना बुधवार १७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अमळनेर तालुक्यातील ढेकू गावातील खळ्यात शेतकरी सुधीर अरूण पाटील आणि शरद मुरलीधर पाटील यांच्या मालकीचे बैलजोडी आपापल्या ठिकाणी मंगळवारी १६ एप्रिल रोजी रात्री १० वाजता बांधण्यात आले होते. दोन्ही शेतकऱ्यांचे ४ बैलांची चोरी केल्याची घटना बुधवारी १७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आले. शेतकरी सुधीर पाटील आणि शरद पाटील यांनी बैलजोडीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर बैलजोडी चोरी झाल्याबाबत अमळनेर पोलीसात तक्रार देण्यात आली. त्यानुसार दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामकृष्ण कुमावत हे करीत आहे.


Protected Content

Play sound