भुसावळ-लाईव्ह ट्रेडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील हॉटेल प्रीमियरसमोर दुचाकीचा कट लागल्याचा जाब विचाराचा कारणावरून एकाला शिवीगाळ करत फरशी डोक्यात टाकून गंभीर दुखापत केल्याची घटना 13 जून रोजी रात्री 10 वाजता घडली होती. याप्रकरणी चौकशी अंती बुधवारी २६ जून रोजी सायंकाळी ४.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, पंकज विजय पाटील वय-४७, रा. शिव कॉलनी भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान १३ जून रोजी रात्री १० वाजता ते भुसावळ शहरातील हॉटेल प्रेमियम समोरून पायी जात होते. त्यावेळी त्यांना दुचाकीचा कट लागला, त्यावरून त्यांनी दुचाकीचा धक्का लागल्याचा जाब विचारला. या रागातून संशयित आरोपी रोहित धनराज गोयल, हेमंत पैठणकर आणि सचिन उर्फ दलाल सर्व रा. भुसावळ या तिघांनी शिवीगाळ करत मारहाण केली तर यातील रोहित गोयल याने हातातील फरशी पंकज पाटील याच्या डोक्यात टाकून गंभीर दुखापत केली. त्यामुळे त्यांना तातडीने भुसावळ येथील ट्रामा केअर सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार घेतल्यानंतर त्यांनी बुधवारी २६ जून रोजी दुपारी ४.३० वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार रोहित धनराज गोयल, हेमंत पैठणकर आणि सचिन उर्फ दलाल या तिघांवर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल समाधान पाटील करीत आहे.