Home Cities जळगाव जळगावातील लेंडी नाल्याजवळ कचऱ्याला आग

जळगावातील लेंडी नाल्याजवळ कचऱ्याला आग


जळगाव (प्रतिनिधी) शहरात शनीपेठेत असलेल्या लेंडी नाला पुलाजवळ असलेल्या कचऱ्याला आज सकाळी आग लागली. या घटनेमुळे परिसरात काही वेळ घबराहट पसरली होती.

या संदर्भात अधिक असे की,शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास लेंडी नाल्याजवळ अचानक आग लागली. लेंडी नाला पुलाचे काम सुरु असल्यामुळे सर्व कचरा पुलाच्या एका बाजूला साचून आहे. तसेच पाईपलाईनसाठी प्लास्टिक पाईप देखील टाकण्यात आले आहे.अचानक लागलेल्या आगीच्या धुराचे लोळ सराफ बाजारापर्यंत साफ दिसत होते. अर्ध्या तासाने आलेल्या मनपा अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा परिस्थिती नियंत्रणात आली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound