भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील पाचदेवळी शिवारातील शेतात अचानक आग लागल्याने मकासह चारा जळून खाक झाल्याची घटना रविवारी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता वरणगाव पोलीसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक असे की, शशीकांत प्रल्हाद पाटील (वय-६२) रा. आचेगाव ता. भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. त्यांचे भुसावळ तालुक्यातील पाचदेवळी शिवारातील शेत गट क्रमांक २५ मध्ये दीड एकर शेत आहे. या शेतात त्यांनी मका लावलेला होता. शनिवारी १८ नोव्हेबर रोजी रात्री साडेआठ ते रविवारी १९ नाव्हेबर रोजी सकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान, त्यांच्या शेतातील मक्याला आग लागली. या आगीत सुमार ८० हजार रूपये किंमतीचा मका आणि चारा जळून खाक झाला आहे. या घटनेनंतर शशीकांत पाटील यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून खबर दिली. त्यानुसार रात्री ९ वाजता वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ प्रमोद कंखरे करीत आहे.