ट्रान्सपोर्ट नगर मधील भंगाराला लागली आग

जळगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील अयोध्या नगर येथे असलेल्या ट्रान्सपोर्ट नगरातील प्रीतम पार्क येथे मोकळ्या जागेतील भंगाराला अचानक आग लागल्याची घटना दुपारी घडली. या आगीत किरकोळ नुकसान झाले असून आग विझविण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील ट्रान्सपोर्ट नगरातील प्रीतम पार्क हाटेलच्या बाजूला जुन्या गाड्या रिपेअरींगचे कामे केली जातात. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भंगार ठेवण्यात आले आहे. शुक्रवार १२ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास येथील भंगाराला अचानक आग लागली. आग लागल्याचे कारण समजू शकले नाही. या आगीची माहिती मिळाल्यानंतर जळगाव महापालिकेचे अग्निशमन विभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. काही वेळात ही आग विझविण्यात आली. आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाचे चालक विक्रांत घोडस्वार, फायरमन भिला कोळी, पन्नाला सोनवणे, संजय तायडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

 

Protected Content