पहूर, ता.जामनेर प्रतिनिधी । पहूर पेठ येथील खॉजानगर मधील इसमास न्यायालयाने गल्लीतील तरुणीच्या विनयभंग प्रकरणी १ वर्षाच्या सक्त मजुरीसह ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
याबाबत गुन्ह्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, दि.७ मार्च २०१९ रोजी आरोपी शाहरुख मशीद तडवी ( रा .पहूर पेठ ) याने त्याच्या गल्लीतील रहिवासी फिर्यादी हीस मोबाईलवरून धमकी दिली की , तिने जर त्याच्या सोबत प्रेम संबंध ठेवले नाही तर तो तिच्या सोबत काढलेले फोटो सोशल मीडियावर प्रसारित करेल व सतत तिचा पाठलाग करून प्रेमसंबंध ठेवण्यासाठी ब्लॅकमेल केले म्हणून या प्रकरणी पहूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाने एकूण चार साक्षीदार तपासले .सर्व साक्षीदारांनी न्यायालयात सरकार पक्षाच्या बाजूने साक्षी दिल्या. सरकार पक्षाने भक्कम बाजू मांडली. दोन्ही पक्षाच्या अंतिम युक्तिवादानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद मान्य करून आरोपीस १ वर्ष सक्तमजुरीसह ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. आरोपीस युवतीचा तिच्या इच्छेविरुद्ध पाठलाग करणे महागात पडले.
जामनेर न्यायालयाचे न्यायाधीश सचीन हवेलीकर यांच्या न्यायालयात सदर खटला चालला .सरकार पक्षातर्फे अॅड. अनिल सारस्वत यांनी बाजू मांडली .त्यांना पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेडकॉन्स्टेबल मोहन पाथरकर व पोलीस कॉन्स्टेबल नीलेश सोनार यांचे सहकार्य लाभले.