जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील हर्षवर्धन कॉलनीतील महादेव मंदीराच्या आवारात ईलक्ट्रीक फिटींगचे कामावरून दोन वृध्दांमध्ये हाणामारी झाल्याची घटना बुधवारी १३ सप्टेंबर रोजी रात्री उघडकीला आली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुका पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील हर्षवर्धन कॉलनीत महादेव मंदीर बांधण्यात आले आहे. यावेळी परिसरात राहणारे लक्ष्मण वेडू मराठे (वय-६१) आणि दिलीप रामसिंग शिंपी (वय-६६) दोन्ही रा. हर्षवर्धन कॉलनी, जळगाव हे महादेव मंदीराच्या आवारात गप्पा मारत बसलेले होते. महादेव मंदीरातील ईलेक्ट्रीक फिटींगे काम बरोबर केले नाही असे लक्ष्मण मराठे हे वृध्द बोलले. याचा राग आल्याने लक्ष्मण मराठे आणि दिलीप शिंपी यांच्यात वाद झाला. त्यानंतर दिलीप शिंपी यांनी हातातील लोखंडी फ्रेम मारल्याने लक्ष्मण मराठे हे जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात बुधवारी १३ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजता दिलीप रामसिंग शिंपी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी करीत आहे.