Home क्राईम कब्रस्थान परिसरातून शेतकऱ्याची मोटारसायकल लांबविली

कब्रस्थान परिसरातून शेतकऱ्याची मोटारसायकल लांबविली


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मुस्लिम कब्रस्थानच्या गेटजवळून शेतकऱ्याची मोटारसायकल  लांबविल्याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील शेतकरी सईद गुलाब पटेल वय ४५ हे ९ जुलै रोजी त्यांच्या कामासाठी जळगाव शहरात आले होते. यादरम्यान त्यांनी त्यांची एम.एच.१९ बी.एन. ५६१८ या क्रमाकांची मोटारसायकल मुस्लिम कब्रस्तानच्या गेटजवळ उभी केली होती. काम आटोपून परतल्यावर त्यांना त्यांची मोटारसायकल  मिळून आली नाही सर्वत्र शोध घेवूनही मोटारसायकल  मिळून न आल्याने सईद गुलाब पटेल यांनी दुसऱ्या दिवशी सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती, या तक्रारीवरुन ३५ हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरुन नेल्याप्रकरणी चोरट्यांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किशोर पाटील हे करीत आहेत.


Protected Content

Play sound