घरासमोरून शेतकऱ्याची दुचाकी लांबविली

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील मुसळी गावातून एका शेतकऱ्याच्या घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी २० जुलै रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, तुषार पंढरीनाथ पाटील रा. मुसळी ता. धरणगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. १६ जुलै रोजी तुषार पाटील यांनी त्यांची दुचाकी क्रमांक (एमएच १२ जीएक्स १०३६) ही त्यांच्या घराच्या समोर पार्कींगला लावलेली होती. अज्ञात चोरट्याने घरासमोर लावलेली दुचाकी चोरून नेली. तुषार पाटील यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळाली नाही. गुरूवारी २० जुलै रोजी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार अरूण निकुंभ करीत आहे.

Protected Content