अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत कुटुंबाला बेदम मारहाण

जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शाहू नगरातील एका भागात  राहणाऱ्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अश्लिल हातवारे करून विनयभंग केला तर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पिडीत मुलीच्या कुटुंबाला मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील शाहूनगरातील खान्देश मिल कॉलनी परिसरात १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह एका बांधकामाच्या ठिकाणी वास्तव्यास आहे. याच परिसरात राहणारे मित सुनिल पटेल, चेतन सुनिल पटेल हे दोघ गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलीची अश्लिल हावभाव करत तिची छेड काढत होते.  शनिवारी २८ ऑक्टोबर रोजी  रात्री ८ वाजेच्या सुमारास पिडीत मुलगी ही रस्त्याने घरी जात असतांना संशयित मित पटेल आणि चेतन पटेल हे दोघांनी तिला आवाज देवून जवळ बोलाविले. नंतर तिचा हात पकडून विनयभंग केला. पिडीत मुलीने हा प्रकार कुटुंबाला सांगितला. याचा जाब विचारण्यासाठी पिडीत मुलीचे वडील गेले. याचा राग आल्याने  मित पटेल, चेतन पटेल व त्यांचे वडीलांसह त्यांचा एक अनोळखी मित्रांनी पिडीत मुलीच्या वडीलांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच मुलीच्या आईच्या अंगावर विटांनी मारहाण केली. या मारहाणी कुटुंबिय जखमी झाले. याप्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून रात्री उशीरा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात मित सुनिल पटेल, चेतन सुनिल पटेल, सुनिल पटेल आणि एक अनोळखी असे एकुण चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content