Home Cities यावल सातपुड्याच्या पाड्यावर माणुसकीची दिवाळी; मंत्री संजय सावकारे, आ.अमोल जावळे आदिवासीबांधवांसोबत

सातपुड्याच्या पाड्यावर माणुसकीची दिवाळी; मंत्री संजय सावकारे, आ.अमोल जावळे आदिवासीबांधवांसोबत

0
सातपुड्याच्या पाड्यावर माणुसकीची दिवाळी; मंत्री संजय सावकारे, आ.अमोल जावळे आदिवासीबांधवांसोबत

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सातपुड्याच्या पर्वतरांगांमधील विटवा आदिवासी पाड्यावर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि रावेर–यावल मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी लायन्स क्लबच्या वतीने फराळ वाटप करून सणाचा आनंद सर्वांसोबत साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मंत्री संजय सावकारे आणि आमदार अमोल जावळे यांनी आदिवासी बांधवांशी संवाद साधत त्यांच्या सुख–दुःखाची विचारपूस केली. दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले. आदिवासी बांधवांचे आपुलकीने केलेले स्वागत आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद यामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण होते.
सण-उत्सव केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता समाजातील प्रत्येक घटकासोबत आनंद वाटून घेण्याच्या सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी लायन्स क्लबचे सदस्य तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती उमेश पाटील, माजी सभापती तथा खरेदी-विक्री सहकारी संघाचे चेअरमन नारायण चौधरी, लायन्स क्लबचे सदस्य तथा भुसावळचे माजी नगराध्यक्ष रमन भोळे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, भाजपचे तालुका सरचिटणीस भरत पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.