जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | एमटीडीसी तर्फे “ॲक्वाफेस्ट ” महाराष्ट्रातील पहिला जल पर्यटन महोत्सवासाठी मेहरूण तलावात दि. 2 ऑक्टोबर पासून होणार आहे. आज एमटीडीसी च्या प्रशिक्षित चमूकडून प्रसार माध्यमाच्या समोर प्रात्यक्षिक करून दाखविले. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी सचिन भायेकर, अरविंद देशमुख, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीरसिंह रावळ, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, माध्यम प्रतिनिधी यांनी अनुभव घेतला.
यात बोट सफारीचा शांत आणि सुरेख बोट राईडचा अनुभव घेतला, काही जणांनी सुपर फास्ट जेट स्की राईड्स जलक्रीडांचा रोमांचक अनुभवही घेतला. उद्यापासून या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून आपदामित्र यांची टीम असेल, एमटीडीसीचे पण अनुभवी तज्ञ असतील, पोलिस पण असतील.अशा या आनंदी महोत्सवाचा जळगावकरांनी आनंद घ्यावा असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आवाहन केले आहे.