चाळीसगाव -लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील पिलखोड गावात शेत जमिनीच्या जुन्या वादातून बापलेकाला धारदार कोयत्याने वार करून गंभीर दुखापत करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार २५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता घडला होता. याप्रकरणी चौकशी अंतिम शुक्रवारी १७ मे रोजी मध्यरात्री २ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात अनिल भाऊराव पाटील वय-५४, हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून त्यांच्या शेतजमिनीच्या कारणावरून गावातील काही जणांसोबत वाद सुरू होता. दरम्यान २५ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता अनिल भाऊराव पाटील आणि त्यांचा मुलगा रोहित अनिल पाटील हे दोघे घरी असताना गावात राहणारे अरुण कृष्णा यशोद, कल्पना अरुण यशोद, अजय अरुण यशोद, विशाल अरुण यशोद आणि संगम अरुण यशोद या पाच जणांनी लोखंडी कोयता घेऊन त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या मारहाणीमध्ये रोहित पाटील आणि अनिल पाटील यांच्यावर कोयत्याने वार करून गंभीर दुखापत केली. या घटनेत बापलेक दोघी जखमी झाले. त्यांना चाळीसगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार घेतल्यानंतर अखेर चौकशी अंती शुक्रवारी १७ मे रोजी मध्यरात्री २ वाजता मेहुणबारे पोलीस ठाण्यात मारहाण करणारे अरुण कृष्णा यशोद, कल्पना अरुण यशोद, अजय अरुण यशोद, विशाल अरुण यशोद आणि संगम अरुण यशोद सर्व रा. पिलखोड ता.चाळीसगाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश घडवजे हे करीत आहे.