बेशुध्द पडलेल्या महिलेच्या मदतीसाठी गोरक्षकाची धाव

साकेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शहरातील मिलन मिठाई समोर स्टेशन रोडवर बाहेर गावावरुन गरीब वयोवृद्ध महिला बेशुद्ध अवस्थेत पडली आहे अशी माहिती नागरिकांनी गोरक्षक रोहित महाले यांना कळविली त्यानंतर त्यांनी घटनास्थळ गाठत महिला अगदी गंभीर परिस्थितीत पडलेली होती हे पाहिल्यावर महालेंनी पोलीसांच्या मदतीने त्यां महिलेला शहरातील ट्रामा सेंटरला हलविले.

तेथील डॉक्टरांनी उपचार करत महिलेला शुध्दीवर आणले.  तिच्याकडून अशी माहिती मिळाली की तिचा मुलगा देखील तिच्या सोबत होता. काही तासांनी तिचा मुलगा ट्रामा सेंटरला आला. आईला बघत मुलाचे डोळे पाणावले होते. त्या मुलाचे स्टेशन भागातील चोरट्यांनी सहा हजार रक्कम व अंगठी घेत मारहाण केली होती, अशी माहिती मिळाली आहे.

Protected Content