चाळीसगाव-लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | घरासमोर फटाके फोडण्यावरून झालेल्या किरकोळ कारणावरून गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टरला लोखंडी रॉडने बेदम मारहाण झाल्याची थरारक घटना तालुक्यातील पिंपरखेड गावात घडली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी सिताराम ओंकार चव्हाण (वय-४२) गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर ह.मु. अर्चना अपार्टमेंट, चाळीसगाव फिर्यादीत नमूद केले आहे की, १३ नोव्हेंबर रोजी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास तालुक्यातील पिंपरखेड तांड्यात शांतीबाई दादा जाधव हिची मुले गावातील फिर्यादी यांच्या घरासमोर फटाके फोडत होती. यावर फिर्यादी यांच्या आई व शांतीबाई दादा जाधव यांच्यात किरकोळ भांडण झाली. अशात फिर्यादी सिताराम चव्हाण यांनी सण असल्याने भांडण करू नका असे सांगितले.
याचाच राग येऊन गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर सिताराम चव्हाण यांना फायटर व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. व फिर्यादीच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व खिशात ठेवलेले ५ हजार रुपये रोकड यावेळी काढले. असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात शांतीबाई दादा जाधव, सुनील दादा जाधव, राहुल दादा जाधव, दयाराम सरदार जाधव, विकास दयाराम जाधव, विनोद चरण राठोड सर्व रा. पिंपरखेड तांडा व शांतीबाई जाधव यांचा जावई (नाव पत्ता माहीत नाही) आदींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि धरमसिंग सुंदरडे हे करीत आहे.