मविआचे उमेदवार ठरवण्यासाठी कमेटी स्थापन केली जाईल – शरद पवार

बारामती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. यंदाच्या निवडणुकीमध्ये दोन महत्त्वाच्या युती आमने-सामने असणार आहेत.विधानसभा निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच महाविकास आघाडी एकत्रितपणे लढणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार शरद पवार यांनी गोविंद बागेमध्ये पत्रकार परिषद स्पष्ट केली की मविआचे उमेदवार ठरवण्यासाठी एक कमिटी स्थापन केली जाईल. यामध्ये संजय राऊत, नाना पटोले, जयंत पाटील यांचा समावेश असेल. या तिन्ही नेत्यांना निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार म्हणाले की, यंदाच्या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये वेगळे वातावरण आहे. लोकसभेमध्ये वेगळे चित्र होते. इच्छुक उमेदवाराला विचारायचे नाही तर सर्वसामान्य कार्यकर्त्याला काय वाटते विचारले जाईल आणि मग निर्णय घेतला जाईल. प्रत्येक तालुक्यात सर्व्हे केला जाणार आहे, असे शरद पवार यांनी जाहीर केले आहे.

यावेळी विविध राजकीय विषयांवर भाष्य करत ते म्हणाले, प्रधानमंत्री सांगत होते ४०० च्या वर जागा येतील. पाच वर्षांपूर्वी जी निवडणूक झाली त्यात राष्ट्रवादीचे चार आणि काँग्रेसचा एक आला होता. आता राष्ट्रवादीने ज्या १० जागा लढल्या त्यातील ८ जागा निवडून आल्या आहेत. लोकांचे मत कार्यकर्त्यांशी मताशी संबंधित होते म्हणून आपल्याला यश मिळाले. नेते आणि नागरिक यांचे मत वेगळे होते. बारामतीत अनेक नेत्यांनी भाषणं केली. आम्ही जागा जिंकणार असे सांगत होते. पण लोकांनी आणि तुम्ही ठरवले होते. १ लाख ५८ हजार मतांनी तुम्ही आपली जागा निवडून आणली. काही लोक असे असतात की आभाळकडे बघून सांगतात पाऊस पडेल की नाही. पण आता कळायला लागले की पाऊस पडेल त्यामुळे गर्दी वाढली आहे, असा टोला शरद पवार यांनी बारामती लोकसभा मतदारसंघाचे उदाहरण देत लगावला आहे.

Protected Content