पुण्यातील एका रूग्णालयात कर्नल डॉक्टरने केला महिला डॉक्टरचा विनयभंग

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पुण्यात एका कर्नल डॉक्टरने महिला डॉक्टरचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शहरातील एएफएमसी रुग्णालयात भारतीय लष्करातील वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या डॉक्टरांना प्रशिक्षण देणाऱ्या मनोसोपचार तज्ञ प्राध्यापक म्हणून काम करत असलेल्या कर्नल डॉक्टर प्रतीक यादव यांनी एका महिला डॉक्टरचा विनयभंग केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा प्रकार ऑगस्ट 2023 ते १७ मे या दरम्यान घडला आहे. आरोपी डॉक्टर प्रतिक यादव हे महिला डॉक्टर यास म्हणाले की, तू माझ्यासोबत चुकीचे केले आहे. मी तुझा डॉक्टर आहे ,तू माझ्यावर विश्वास ठेवत नाही व माझ्यावर चुकीचे आरोप करत आहे असे बोलत महिला डॉक्टरच्या हाताला धरून तिला जवळ ओढून जबरदस्ती तिचा विनयभंग केला. त्यानंतर पुन्हा सायंकाळी तिच्या क्लिनिक मध्ये तो आला. त्यावेळी महिला डॉक्टर त्यास म्हणाली की, मी तुझ्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर तू नॉर्मल वागतो आणि माझ्या क्लिनिक मध्ये आल्यानंतर माझ्यासोबत गैरवर्तन करतो.यावेळी आरोपीने ओरडून महिला डॉक्टरला म्हणाला, तू मलाच ब्लेम करते असं म्हणून तिला जवळ ओढून तिच्याशी आक्षेपार्ह वर्तन करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. महिलेने त्यास विरोध केला असता, तिच्याशी अश्लील बोलणे करून स्त्री मनास लज्जा निर्माण होईल असे वर्तन केले आहे. याप्रकरणी पीडित डॉक्टर महिलेने आरोपी विरोधात वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे .

Protected Content