जळगावात रिक्षा चालकाचा मोबाईल लांबविला

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नेरीनाका लक्झरी बसस्थानकातून एकाचा १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लांबविला. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, फारूख हलीम पटेल (वय-५६) रा. सुप्रिम कॉलनी जळगाव हे रिक्षा चालक आहे. ३० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास रिक्षा घेवून नेरी नाका जवळील लक्झरी स्थानकाजवळ त्यांनी रिक्षा लावली होती. यावेळी एकाने रिक्षात घर सामान भरण्यासाठी दोन जणांना बोलावितो असे सांगून रिक्षा मागे घेण्यास सांगितले असता फारूख पटेल यांचा १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल लांबविला. मोबाईल चोरी गेल्या प्रकरणी रिक्षा चालक यांनी शनीपेठ पोलीसात रात्री ८ वाजता तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ परिष जाधव करीत आहे.

Protected Content