धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द गावातील रुक्मिणी नगरात मध्यरात्री तरूणाचे बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत कपाटातील २ लाख रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली. याबाबत रात्री ९ वाजता धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, परेश सुभाष सोनवणे (वय-२५) रा.रुक्मिणी नगर, पाळधी खुर्द ता. धरणगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. चहाची टपरी चालवून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत प्लॉट घेण्यासाठी ठेवलेले २ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना उघडकीला आले. हा प्रकार बुधवारी २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आला. घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर परेश सोनवणे यांनी रात्री ९ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ करीत आहे.