Home क्राईम कोथळी येथे बंद घर फोडून ३८ हजारांची रोकड लांबविली

कोथळी येथे बंद घर फोडून ३८ हजारांची रोकड लांबविली


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कोथळी येथील एकाचे बंद घर फोडून ३८ हजारांची रोकड लांबविल्याची घटना २९ मार्च रोजी रात्री ८ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, प्रविण श्रीराम जंगले वय ४० रा. कोथळी ता. मुक्ताईनगर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २९ मार्च रोजी दुपारी २ वाजेपासून त्यांचे घर बंद असतांना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करत घरातील कपाटातून ३८ हजार रूपयांची रोकड लांबविली. ही बाबत रात्री ८ वाजता समोर आली. त्याप्रकरणी प्रविण जंगले यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप वानखेडे हे करीत आहे.


Protected Content

Play sound