जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद गावाजवळील जयभोले हॉटेल समोरील राष्ट्रीय महामार्गावर चालकाचा ताबा सुटल्याने रोडवरील खंब्याला कार आदळल्याने महिलेचा मृत्यू झाल्याची घटना २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली होती. या अपघात प्रकरणी सोमवारी ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात कार वरील चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील जय भोले हॉटेल समोरील राष्ट्रीय महामार्गावरून २ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता चालक रितेश कैलास पाटील रा. पातोंडी ता. रावेर हा कार क्रमांक (एमएच १९ सीव्ही ७०३३) ने भुसावळकडे जात होता. त्यावेळी कारमध्ये सावित्रीबाई सुनिल हंसकर वय-४५ रा. रावेर आणि शितल रामलाल भावसार वय-४१ रा. शांतीदुत नगर, रावेर या दोन महिला बसलेल्या होत्या. त्यावेळी चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार थेट रोडवरील एका खंब्यावर आदळली. या अपघातात सावित्रीबाई सुनिल हंसकर वय-४५ रा. रावेर या महिला गंभीर जखमी झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तर चालक रितेश पाटील आणि शितल भावसार हे दोघी जखमी झाले. या अपघात प्रकरणी शितल भावसार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी ११ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात कार चालक रितेश पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अलियार खान हे करीत आहे.