खासगी लक्झरी बस अपघात प्रकरणी धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द गावाजवळ खासगी लक्झरी बसवरील चालकाचा ताबा सुटल्याने पलटी होऊन एक प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी २७ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रविवारी २८ एप्रिल रोजी रात्री १० वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात खाजगी लक्झरी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द गावात जवळ असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरून आर.आर. ट्रॅव्हल्स ही आकोल्याकडून गुजरात येथे जात होती. त्यावेळी या ट्रॅव्हल्सवरील चालकाचा ताबा सुटला, त्यामुळे भरधाव जाणारी लक्झरी बस ही पलटी झाली. या अपघातात प्रवासी कौतिक सापुराळा गवळी वय-५० रा.उधना जि.सुरत गुजरात हे जखमी झाले आहे. तसेच अपघात घडल्यानंतर ट्रॅव्हल चालक वाहन सोडून हा पसार झाला. याप्रकरणी जखमी झालेले कौतिक गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी २८ एप्रिल रोजी रात्री १० वाजता आर. आर. ट्रॅव्हल्स वरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ विठ्ठल पाटील हे करीत आहे.

Protected Content