जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील हरिविठ्ठल नगरातील सांभाळलेल्या मोकळ्या जागेतून २५ हजार रुपयांचे १० लोखंडी पत्रे आणि लाकडी बल्ल्या चोरुन नेल्याची घटना उघडकीला आले आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील जूना मेहरुण रोड परिसरातील सम्राट कॉलनीत मिना मिलींद पवार या वास्तव्यास आहे. १० जानेवारी रोजीच्या सुमारास त्यांनी हरिविठ्ठल नगरातील रेल्वे पटरीला लागून सांभाळलेल्या मोकळ्या जागेत २५ हजार रुपयांचे १० पत्रे आणि बल्ली ठेवल्या होत्या. दरम्यान, ते साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना दुसऱ्या दिवशी ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता उघडकीस आला. साहित्य चोरीला गेल्यानंतर त्यांनी परिसरात सर्वत्र शोध घेतला पंरतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर मिना पवार यांनी रामानंद नगर पोलिसात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन शुक्रवारी १९ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध रामानंद नगरपोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सुर्यवंशी हे करीत आहे.